संस्कार प्राथमिक विद्यालयात योग कार्यशाळेचे आयोजन

You are currently viewing संस्कार प्राथमिक विद्यालयात योग कार्यशाळेचे आयोजन
Share the Sanskar Times

सोमवार, 20 मे 2024 – संस्कार प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी विशेष प्रशिक्षकांची व्यवस्था करण्यात आली होती.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष जगदीशजी देसले सर उपस्थित होते. तसेच, लीना देसले मॅडम, सायली मॅडम, केतकी मॅडम, मुख्याध्यापिका ज्योती तळेले मॅडम, विभाग प्रमुख योगेश्वर सहाने सर आणि अर्जुन डभाडे सर हेही उपस्थित होते. संस्कार बालक मंदिरच्या सर्व शिक्षकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध योगासनांचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, त्याचे शारीरिक व मानसिक फायदे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने योगासने करून दाखवली आणि योगाच्या नियमित सरावाने आरोग्य कसे सुधारता येते हे शिकले.

प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक केले आणि त्यांच्या आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागरूकता निर्माण झाली आणि त्यांनी नियमित योग करण्याची प्रतिज्ञा घेतली.

सर्व उपस्थितांनी या कार्यशाळेचा मनमुराद आनंद घेतला आणि भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply